सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी रोज नवं नाट्य पाहायला मिळतंय आणि नुकतच रियाने एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवरून वादंग माजलं असतानाच सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीनेदेखील आता रियावर निशाणा साधला आहे. रिया आपल्या भावाची, सुशांत सिंगची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप सुशांतच्या बहिणीने केला आहे. सुशांतच्या बहिणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून रियाला टार्गेट केलं आहे. सुशांतची बहिण श्वेता सिंग रियावर चांगलीच बरसली आहे. श्वेता सिंह किर्ती ट्विट करत म्हणाली की, 'टीव्हीच्या माध्यमातून मृत्यूनंतर माझ्या भावाची प्रतिमा मलिन करण्याची तुझी हिंमत झालीच कशी. तुला वाटत आहे देव तुझे कृत्य पाहता नाही. मला देवावर पूर्ण विश्वास आहे तो नक्की सुशांतला, आमच्या सगळ्या राजपूत कुटुंबाला न्याय मिळवून देईल...
या मुलाखतीत रियाने सुशांतची युरोप ट्रिप, त्यात तो घेत असलेली औषधं, त्याचा ड्रिम प्रोजेक्ट यावर रियानं भाष्य केलं आहे. सुशांतला आधीपासूनच क्लोस्ट्रोफोबियाचा त्रास होता. याबाबत सुशांतने स्वतच आपल्याला युरोप टूरमध्ये विमानात बसण्याआधी सांगितलं होतं. सुशांत यासाठी एक औषध घेत होता. त्या औषधाचं नाव मोडाफिनी होतं. ते औषध कायम त्याच्यासोबत असायचं. त्यानं विमानात जाण्यापूर्वी ते औषध घेतलं. त्याच्याकडे आधीपासून ते औषध असल्यानं प्रिस्क्रिब्शनची गरज नव्हती, असं रियानं मुलाखतीत सांगितलं. मात्र रिया जे काही सांगतेय ते हे सारं काही तथ्यहिन असल्याचं सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्तीने स्पष्ट केलंय.
#lokmatCNXFilmy #RheaChakraborty #SSRCase
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber